
गोव्यात रशियन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन नेपाळी तरुणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी (1 डिसेंबर) एका 37 वर्षीय रशियन महिलेवर बलात्कार झाला.
पोलिसांनी सांगितले की, गोव्यात पोहोचण्याच्या पहिल्याच दिवशी महिलेवर अत्याचार करण्यात आला. ही महिला गुरुवारी रशियाहून गोव्यात आली होती. कळंगुट पोलीस ठाण्याचे अधिकारी दत्तगुरू सावंत म्हणाले, “दोन्ही आरोपी 23 वर्षांचे असून ते हॉटेलमध्ये काम करायचे. शुक्रवारी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.