जर आपण सौंदर्याबद्दल बोललो तर रशियन मुलींचा उल्लेख करणे स्वाभाविक आहे. रशियन महिलांचे सौंदर्य जगभरातील सर्वांचे लक्ष वेधून घेते. रशियन सौंदर्याची क्रेझ भारतात शिगेला पोहोचली आहे. येथील महिला अनेकदा रशियन स्किनकेअरचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत असतात. रशियन लोकांच्या सौंदर्याची अनेक कारणे आहेत. आनुवंशिकता, पर्यावरण आणि खाण्याच्या सवयींचा प्रभाव रशियन लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. रशियन महिला त्यांच्या त्वचेची आणि केसांची खूप काळजी घेतात, ज्यामुळे त्यांचे सौंदर्य वाढते.
इंग्रजी वेबसाईट मीडियमच्या रिपोर्टनुसार, रशियन महिलांच्या सौंदर्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. रशियन लोकांची जीन्स, जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि त्वचेची काळजी यासारख्या घटकांमुळे ते सर्वात सुंदर बनू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. रशियन फूड खूप चांगले मानले जाते आणि त्यामुळेच तिथल्या लोकांचा फिटनेस चांगला आहे. केवळ रशियाच्या स्त्रियाच नाही तर तिथले पुरुषही खूप देखणे आहेत. रशियाचे वातावरणही खूप चांगले आहे आणि तिथले स्वच्छ आणि थंड हवामानही सौंदर्य वाढवण्यात मोठा हातभार लावू शकते.