रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली असून रशिया-युक्रेन सीमेवरील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला झाला आणि आता रशियन रणगाडे युक्रेनमध्ये घुसले आहेत. युक्रेन देखील कोणत्याही बाबतीत रशियापेक्षा कमी नसल्याचे सांगितले जात आहे. पॉवर इंडेक्सच्या यादीत जगातील 140 देशांमध्ये रशिया दुसऱ्या तर युक्रेन 22 व्या क्रमांकावर आहे. दोन्ही देशांचे राखीव सैन्य दल समान आहे.
अशा परिस्थितीत युक्रेनमधून शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या एका महिलेची जोरदार चर्चा आहे. ही युक्रेनियन महिला हातात आधुनिक बंदूक घेऊन उभी आहे आणि तिच्या शेजारी एक बंदूक आणि अनेक गोळ्या ठेवण्यात आल्या आहेत. आता जाणून घ्या कोण आहे ही महिला आणि ती काय करते.
अलिसा असे या युक्रेनियन महिलेचे नाव असून ती मूळची युक्रेनची राजधानी कीव येथील आहे. अलिसाचे वय 38 वर्षे असून तिला 7 वर्षांचे एक मूलही आहे. अलिसा युक्रेनियन सशस्त्र दलाचा लष्करी राखीव भाग असलेल्या प्रादेशिक संरक्षण दलात दीड वर्षांसाठी सामील झाली. फोर्समध्ये सामील होण्यासोबतच, अलिसा सायबर सिक्युरिटीमध्ये काम करणाऱ्या संस्थेमध्ये मीडिया रिलेशन स्पेशलिस्ट देखील आहे.