रशिया – एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनने सहकार्य केल्यास नाटोला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी दिली आहे. मात्र युक्रेनवर कब्जा करण्याचा आपला इरादा नसल्याचे पुतीन यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनच्या सैन्याने शस्त्र खाली ठेवून माघार घ्यावी, असे रशियाच्या राष्ट्राध्यांनी म्हटले आहे.
युद्ध जाहीर केल्यानंतर लगेचच युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागामध्ये मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रमाटोस्कमध्ये 2 स्फोट ऐकू आले आहेत. रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत. दोन लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात आहेत. पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक भागामध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
#BREAKING Russia’s Putin announces a ‘military operation’ in Ukraine pic.twitter.com/N3cNy0Lc3e
— AFP News Agency (@AFP) February 24, 2022
क्रेनमध्ये देशव्यापी आणीबाणी जाहीर
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन Russian President Vladimir Putin यांना त्यांच्या देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर युक्रेनने Ukraine बुधवारी देशव्यापी आणीबाणी घोषित केली. दरम्यान आता पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली.