
पुणे – शिवसेना आमदार बंडखोरी प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली आहे. ट्विट करत त्यांनी या बंडखोरीला कारणीभूत ठरवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करून दिली. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून नारायण राणेंवर टीका केली जात आहे. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली आहे.
रुपाली पाटील पुढे म्हणाल्या, नारायण राणे यांची भूमिका भाजपची भूमिका आहे का? नारायण राणेंसारख्यांच्या धमकीला कोणी भीक सुद्धा घालत नाही. स्वतःला ईडीपासून वाचवण्यासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत आणि हे सर्व जगाला माहिती आहे. नारायण राणेंना वाटत असेल ते स्वतः फार मोठे गुंड आहेत, आम्हाला गुंड बनायला भाग पाडू नका. बापाला धमकी देण्याचे काम करू नका. राजकारणात बदनाम आहात, आता नात्यात होऊ नका. पावसाळा आहे, बेडकं बाहेर येणारच, असा टोलाही पाटील यांनी यावेळी बोलताना लगावला.