
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयामध्ये हा धमकीचा फोन आलेला आहे. पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा धमकीचा फोन आज दुपारच्या सुमारास महिला आयोगाच्या कार्यालयात आलेला होता. अहमदनगरमधील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळत आहे.
रुपाली चाकणकर यांना अशा धमकीचा फोन पहिल्यांदाच आलेला नाही. याअगोदरही दोन वेळा रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन आलेले होते. तुमचा कार्यक्रम करु, अशा प्रकारची भाषा त्या धमकीच्या फोनमध्ये वापरण्यात आली होती.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे रुपाली चाकणकर यांचे कार्यालय आहे. २६ डिसेंबर २०२० रोजी एका व्यक्तीने फोन करत चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती. यावेळी रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.