
नवी दिल्ली – सतत वाढणाऱ्या महागाईदरम्यान सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारने अचानक मोठा दिलासा दिला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Cylinder Price), पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel prices) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या (पेट्रोल, डिझेल, गॅस) भाववाढीबाबत लोकांच्या सरकारकडे बऱ्याच दिवसांपासून तक्रारी होत्या. मात्र आता सरकारने या प्रकरणी मोठे पाऊल उचलत हा निर्णय घेतला आहे.
VIDEO : “आमच्यावर होणारे बलात्कार थांबवा”, विवस्त्र होत ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर घुसली महिला
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर 200 रुपयांची (12सिलिंडर) सबसिडी देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी केली असून तब्बल 9 कोटींहून अधिक लोकांना या सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
8/12
I wish to exhort all state governments, especially the states where reduction wasn’t done during the last round (November 2021), to also implement a similar cut and give relief to the common man.— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 21, 2022
तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती घेऊ शकता. घरगुती गॅस सिलिंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावे लागेल. याठिकाणी कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. यासाठी तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करावे लागेल. दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जातात.