RRR Box Office;16व्या दिवशी चित्रपटाची कमाई 1000 कोटींच्या पुढे

WhatsApp Group

एक काळ असा होता की कोणत्याही चित्रपटाचा 100 कोटींच्या क्लबमध्ये समावेश हा यशस्वी होण्याचा निकष होता. आपल्या चित्रपटाचा 100 कोटींच्या क्लबमध्ये समावेश व्हावा, ही प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. पण काळाच्या ओघात किती बदल झालाय ते बघून. जिथे 10 वर्षांपूर्वी 100 कोटी हा मोठा आकडा मानला जात होता, तिथे आता ही गोष्ट सामान्य झाली आहे. एसएस राजामौली यांचा चित्रपट आरआरआर या चित्रपटाने एकूण 1000 कोटींची कमाई केली आहे. आता RRR कमाईचे नवीन आकडे समोर आले आहेत.

काही काळापासून बॉक्स ऑफिसवर साऊथच्या चित्रपटांचा बोलबाला होताना दिसत आहे. साऊथचे सिनेमे रिलीज होत आहेत आणि जबरदस्त कमाई करत आहेत. आधी पुष्पाचा कहर दिसला आणि आता एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाचे वादळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. राजामौली यांच्या चित्रपटाने त्यांच्या सुपरडुपर ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीचा विक्रमही मोडीत काढला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, RRR चित्रपट 1000 कोटी कमावणारा देशातील तिसरा चित्रपट ठरला आहे.

चित्रपटाच्या रिलीजच्या 16 व्या दिवशी, एसएस राजामौलीच्या आरआरआरने स्वतःला उंचीच्या शिखरावर आणून स्वतःला मजबूत स्थान मिळवून दिले आहे, ज्यासमोर मोठे चित्रपट बटू दिसू लागले आहेत. या चित्रपटाने 16व्या दिवशी जगभरात 1000 कोटी कमाईचा जादुई आकडा गाठला आहे. याआधी फक्त प्रभासचा बाहुबली 2 आणि आमिर खानचा दंगल या चित्रपटांनीच इथपर्यंत मजल मारली आहे.

आता हा चित्रपट आगामी काळात देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरतो की नाही हे पाहावे लागणार आहे. सध्यातरी एकही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. जॉन अब्राहमचा अटॅक हा चित्रपटही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊ शकला नाही. हळूहळू अनुपम खेरच्या काश्मीर फाइल्सलाही प्रेक्षक कमी मिळत आहेत. अशा परिस्थितीत RRR चित्रपटाला देशात अधिक कमाई करण्याची संधी आहे.