RR vs MI: पावसामुळे खेळ थांबला, सामना पूर्ण झाला नाही तर हा’ संघ जिंकेल

0
WhatsApp Group

आयपीएल 2024 चा 38 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आहेत. राजस्थान रॉयल्स संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघ सातव्या स्थानावर कायम आहे. उभय संघांमधील या मोसमातील हा दुसरा सामना आहे. याआधी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला होता.

पावसामुळे सामना थांबला
पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हा सामना पुन्हा सुरू झाला नाही तर सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावला जाईल. डकवर्थ लुईस नियमानुसार, राजस्थानला 6 षटकात 41 धावा करायच्या होत्या पण राजस्थान संघाने 61 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत राजस्थानचा संघ सध्या सामन्यात पुढे आहे. येथून सामना झाला नाही तर राजस्थान हा सामना जिंकेल.

राजस्थान रॉयल्सने पहिल्या 6 षटकांनंतर एकही विकेट न गमावता 61 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल 31 आणि जोस बटलर 28 धावांसह खेळत आहे. राजस्थानला आता येथून सामना जिंकण्यासाठी 14 षटकांत 119 धावांची गरज आहे.