आयपीएल 2024 चा 37 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरत हार्दिक पंड्याने शतक पूर्ण केले आहे. तो मुंबई इंडियन्सकडून 100 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. मुंबईसाठी अशी कामगिरी करणारा तो 7वा खेळाडू ठरला आहे.
मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याने सोमवारी एक मोठा टप्पा गाठला आहे. मुंबईसाठी 100 सामने खेळणारा तो 7वा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा हा मुंबईसाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. मुंबईसाठी 100 सामने खेळलेल्या सर्व 7 खेळाडूंची नावे येथे तुम्ही पाहू शकता.
💯 matches in IPL for Mumbai Indians 💙
A special evening for #MI Captain Hardik Pandya in Jaipur 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/Mb1gd0UfgA#TATAIPL | #RRvMI | @hardikpandya7 | @mipaltan pic.twitter.com/2NhJFv0eNY
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2024
- रोहित शर्मा- 205
- किरॉन पोलार्ड – 189
- हरभजन सिंग- 136
- जसप्रीत बुमराह – 127
- लसिथ मलिंगा – 122
- अंबाती रायुडू- 114
- हार्दिक पांड्या – 100*
हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते, जेव्हा तो फक्त 22 वर्षांचा होता. आकडेवारीबद्दल बोलायचे तर हा अष्टपैलू हार्दिकने 130 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 145.92 च्या स्ट्राइक रेटने आणि 29.88 च्या सरासरीने 2450 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 10 अर्धशतके झळकावली आहेत. या कालावधीत त्याने 33.82 च्या सरासरीने 57 विकेट्सही घेतल्या आहेत
IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिकला सोडले होते. त्यानंतर गुजरात टायटन्सने या खेळाडूला जोडून संघाची कमान सोपवली. हार्दिकने जीटीला चॅम्पियन बनवून आपली क्षमता सिद्ध केली. यानंतर, आयपीएल 2023 च्या लिलावानंतर लगेचच मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या कॅम्पमध्ये परत बोलावले. फ्रँचायझीने रोहित शर्माला काढून संघाचे कर्णधारपद हार्दिककडे सोपवले.