RR vs GT: गुजरातचे टायटन्स सुस्साट! रोमांचक सामन्यात राजस्थानचा 3 गडी राखून केला पराभव

WhatsApp Group

RR vs GT 2024:  राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2024 चा 24 वा सामना आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान संघाने 3 गडी गमावून 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने 7 गडी गमावून लक्ष्य गाठले. रशीद खान आणि राहुल तेवतिया यांनी गेल्या सामन्यात गुजरातला विजय मिळवून दिला. तर कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. तर साई सुदर्शनने 35 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून कुलदीप सेनने सर्वाधिक 3 बळी घेतले. चहलला 2 बळी मिळाले. तर आवेश खानला यश मिळाले.

197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरात संघाची सुरुवात चांगली झाली. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 50 चेंडूत 64 धावांची भागीदारी झाली. यानंतर कुलदीप सेनने सईला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. साई सुदर्शन 29 चेंडूत 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मॅथ्यू वेड काही विशेष करू शकला नाही आणि केवळ 4 धावा करून बाद झाला. अभिनव मनोहर एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर युझवेंद्र चहलने राजस्थानला चौथे यश मिळवून दिले. त्याने विजय शंकरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शंकरने 10 चेंडूत 14 धावा केल्या. त्यानंतर युझवेंद्र चहलने गुजरातला मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार शुभमन गिलला यष्टीचीत केले. 44 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी केल्यानंतर गिल बाद झाला. यानंतर शाहरुख खानही काही विशेष करू शकला नाही. आवेश खानने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. शाहरुख 8 चेंडूत 14 धावा करून बाद झाला.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान संघाने 3 गडी गमावून 197 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन आणि रायन पराग यांनी तुफानी खेळी खेळली. संजू सॅमसनने 68 आणि रियान परागने 76 धावा केल्या होत्या.

राजस्थान रॉयल्सचा संघ 

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्सचा संघ 

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा.