RR vs DC: राजस्थानचा हल्ला बोल, दिल्लीचा 12 धावांनी केला पराभव

WhatsApp Group

IPL 2024 RR vs DC: आज 28 मार्च रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. प्रथम खेळताना राजस्थानने 185 धावांची मोठी मजल मारली होती. रियान परागने 45 चेंडूत 84 धावा करत राजस्थानला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या संघाने लवकर 2 गडी गमावले असले तरी ऋषभ पंत आणि डेव्हिड वॉर्नरच्या 67 धावांच्या भागीदारीने संघाला पुनरागमन केले. शेवटच्या 5 षटकात दिल्लीला विजयासाठी 66 धावांची गरज होती, मात्र संघाचे फलंदाज गडगडत राहिले. त्यामुळे दिल्ली हा सामना 12 धावांनी हरला आहे.

राजस्थान रॉयल्सचे फलंदाज सुरुवातीला गडबडले होते. संघाने 36 धावांत जोस बटलर, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. मग रियान परागने दमदार फटकेबाजी केली. परागने 45 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 84 धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विनने 19 चेंडूत 3 षटकार खेचून 29 धावा केल्या आणि शेवटी ध्रुव जुरेलने 12 चेंडूत 20 धावा आणि शिमरॉन हेटमायरने 7 चेंडूत 14 धावांचे योगदान दिले. शेवटच्या 5 षटकांमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. मुकेश कुमारने शेवटच्या 2 षटकात 30 धावा आणि शेवटच्या षटकात ॲनरिक नॉर्टजेने 25 धावा दिल्या. यासह राजस्थानचा डाव 185 धावांवर संपला.

राजस्थानचा रोमहर्षक विजय
दिल्ली कॅपिटल्सने लक्ष्याचा पाठलाग करताना पहिले 2 विकेटही झटपट गमावल्या. धावसंख्या 30 धावेपर्यंत मिचेल मार्श आणि रिकी भुई पॅव्हेलियनमध्ये परतले होते. दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने 34 चेंडूत 49 धावांची खेळी करताना 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. कर्णधार ऋषभ पंतने 26 चेंडूत 28 धावा केल्या, पण तो डीसीला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. दिल्लीला शेवटच्या 24 चेंडूत 60 धावांची गरज होती, पण त्यानंतर अश्विनने 17 व्या षटकात 19 धावा दिल्या. सामना उलटेल असे वाटत होते आणि ट्रिस्टन स्टब्सच्या २३ चेंडूत ४४ धावांच्या खेळीने डीसीच्या विजयाच्या आशा उंचावल्या. दरम्यान, 19व्या षटकात संदीप शर्माने 15 धावा दिल्या, त्यामुळे दिल्ली शेवटच्या षटकापर्यंत सामन्यात टिकून राहिली. शेवटच्या षटकात डीसीला 19 धावांची गरज होती, परंतु आवेश खानने चांगली गोलंदाजी करत दिल्लीला 12 धावांनी विजय मिळवून दिला.

राजस्थानची शानदार गोलंदाजी
या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. राजस्थानकडून गोलंदाजी करताना युझवेंद्र चहल आणि बर्गरने प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय आवेश खानने एक विकेट घेतली. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती पण आवेश खानने त्याच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे शेवटच्या षटकात केवळ 5 धावा दिल्या.