IPL 2022: मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीगमध्ये IPL मुंबई इंडियन्सला Mumbai Indians सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मोसमात आतापर्यंत रोहित शर्माच्या मुंबई संघाला विजयाचे खाते उघडता आले नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा या मोसमातील हा तिसरा विजय  ठरला आहे. बंगळुरू संघाने हा सामना 7 विकेट्स राखत जिंकला आहे. या मोसमात मुंबईचा संघ अजून 2-3 सामने हरल्यास त्यांचे बाद फेरीचे आव्हान संपुष्टात येणार आहे.

मुंबईच्या संघाने बंगळुरू संघाला केवळ 151 धावांचे लक्ष्य दिले होते, बंगळुरू संघाने हे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात बंगळुरू संघाचा युवा फलंदाज अनुज रावतने संघाला दमदार सुरुवात करून दिली. कर्णधार फाफ डू प्लेसी 24 चेंडूत 16 धावा करत बाद झाला. त्यानंतर अनुज रावतने आणि विराट कोहलीने दमदार फटकेबाजी सुरू ठेवली. अनुज रावत 47 चेंडूत 66 धावा करत धावबाद झाला. तर विराट कोहली 36 चेंडूत 48 धावांवर बाद झाला.

मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार रोहित शर्मा व इशान किशन यांनी सुरुवात चांगली केली मात्र रोहित शर्मा 15 चेंडूत 26 धावा करत बाद झाला तर ईशान किशन 28 चेंडूत 26 धावांवर बाद झाला. मुंबईचे दिग्गज खेळाडू माघारी परतल्यानंतर सूर्याकुमार यादवने एकट्यानेच किल्ला लढवत जोरदार फटकेबाजी करत 37 चेंडूत 68 धावांची खेळी केली.  बंगळुरूसाठी गोलंदाजीत हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर आकाश दीपने 1 विकेट घेतली.