
इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडत असतो. 2008 मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासून ही प्रक्रिया सुरू आहे, ज्यामध्ये काही खेळाडूंना खूप पैसे देऊन खरेदी केले जाते. साहजिकच अशा खेळाडूंकडून संघांच्या अपेक्षाही तितक्याच जास्त असतात. एखादा खेळाडू कामगिरी करू शकला नाही तर त्याला संघातून वगळले जाते किंवा पुढच्या हंगामात सोडले जाते. पण यासाठी खेळाडूला थप्पड मारली जाऊ शकते का?
साहजिकच हे घडण्याची शक्यता नाही आणि पण तसे घडले आहे. न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलरला अशाच धक्कादायक घटनेला सामोरे जावे लागले आहे. टेलर गेल्या काही दिवसांपासून आपल्या खळबळजनक खुलाशांमुळे चर्चेत असून आता त्याने आयपीएलबाबत असा खुलासा केल्याने राजस्थान रॉयल्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टेलरने त्याच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या आत्मचरित्रात त्याने आपण एका सामन्यात खराब कामगिरी केल्याबद्धल राजस्थान रॉयल्सच्या तत्कालीन मालकांपैकी एकाने थप्पड मारल्याची घटना सांगितली आहे. टेलरच्या आत्मचरित्राचा हा भाग Stuff.co.nz या न्यूझीलंड वेबसाइटवर प्रकाशित झाला आहे. त्यात टेलरने लिहिले की, मोहालीत राजस्थान आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना झाला. लक्ष्य होते 195, मी शून्यावर LBW आऊट झालो होतो आणि आम्ही हरायला आलो होतो कारण लक्ष्य मोठे होते. राजस्थान रॉयल्सचा एक मालक माझ्याकडे आला आणि म्हणाला, रॉस, आम्ही तुला एक मिलियन डॉलर शून्यवर बाद होण्यासाठी दिले नाहीयत. आणि नंतर माझ्या तोंडावर तीन-चार चापट मारली.
या घटनेने टेलरला धक्काच बसला होता. जरी त्याने लिहिले की हे मोठ्याने थप्पड नव्हते, परंतु व्यावसायिक खेळांमध्ये अशा घटनेची अपेक्षा करू शकत नाही. त्याने पुढे लिहिले, तो हसत होता आणि ती एक जोरात थप्पड नव्हती, परंतु मला खात्री नाही की ते फक्त विनोद करत होते. मला याबद्दल गडबड करायची नव्हती, परंतु इतर कोणत्याही व्यावसायिक क्रीडा वातावरणात असं काही घडण्याची कल्पना मी करू शकत नाही.