सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत रूटने वॉर्नरला टाकले मागे

WhatsApp Group

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सचिन तेंडुलकरशिवाय १००शतके कोणीही झळकावू शकलेला नाही. सक्रिय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली ७० आंतरराष्ट्रीय शतकांसह या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावत जो रूटने आता शतकांच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. रुटचे हे ४४वे आंतरराष्ट्रीय शतक होते, तर वॉर्नरने ४३ आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. मात्र या यादीत रूटला पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचणे कठीण आहे.

कारण जो रूट सध्या फक्त कसोटी फॉरमॅटमध्ये खेळत आहे आणि त्याला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये इंग्लंड संघात स्थान मिळत नाही, तर दुसरीकडे विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात.

या यादीत सचिनच्या खात्यात १०० आंतरराष्ट्रीय शतके आहेत, तर आंतरराष्ट्रीय शतकांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर कुमार संगकारा चौथ्या क्रमांकावर आहे त्याने ६३ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट सध्या रिकी पाँटिंगपासून केवळ एक पाऊल दूर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारे खेळाडू 

  • सचिन तेंडुलकर – १०० शतके
  • रिकी पाँटिंग – ७१ शतके
  • विराट कोहली – ७० शतके
  • कुमार संगकारा – ६३ शतके