न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित असेल भारताचा कर्णधार, ऋतुराजला मिळाली संधी

WhatsApp Group

मुंबई – न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला असून विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे भारतीय टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर लोकेश राहुलकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

बीसीसीआयने मंगळवारी रात्री ही घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या टी२० मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. तर अनेक तरुण खेळाडूंना संधी मिळाली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यात मराठमोळा चेन्नईचा मुख्य फलंदाज ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल, यांचा समावेश आहे. तर श्रेयस अय्यरही दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. विश्वचषकासाठी निवड न झालेला युझवेंद्र चहलही भारतीय संघात परतला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेला संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार.