IND vs NZ: पांड्या, सूर्या आणि इशान जखमी, न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्मा खेळणार ‘या’ प्लेइंग 11 सोबत!

WhatsApp Group

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना आज जगातील सर्वात सुंदर स्टेडियम, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, धरमशाला येथे खेळला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघ पूर्ण तयारीत आहेत. दोन्ही संघांनी विश्वचषकात आतापर्यंत एकूण 4 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी सर्व सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत आज एका संघाचा विजय रथ थांबणार आहे. आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धचा विक्रम काही खास राहिला नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मा या विक्रमाच्या विरुद्ध कामगिरी करून टीम इंडियाला हा सामना जिंकून देऊ इच्छितो.

न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे काही खेळाडू जखमी झाले आहेत. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे स्टार खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यातून बाहेर आहे, तर दुसरीकडे इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचा फिटनेस विशेष नाही. धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान हे दोन्ही खेळाडू जखमी झाले होते. सूर्याच्या मनगटाला दुखापत झाली आहे, तर इशान किशनला सरावाच्या वेळी मधमाशी चावली. त्यामुळे त्याला खूप वेदना होत असल्याचे दिसून आले.  अशा परिस्थितीत या सामन्यापूर्वी भारताच्या संभाव्य प्लेइंग 11 वर एक नजर टाकूया.

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाला प्लेइंग 11 मध्ये बदल करावे लागतील. बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरलेल्या 11 खेळाडूंपैकी दहा खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. अशा परिस्थितीत हे 10 खेळाडू आजच्या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हार्दिक पांड्याच्या बदलीबद्दल बोलायचे झाले तर बेंचवर बसलेल्या सूर्या आणि इशान किशनची प्रकृती चांगली दिसत नाहीये. धर्मशाळेचे हवामान आणि परिस्थिती लक्षात घेता रोहित शर्मा वेगवान गोलंदाजासोबत जाऊ शकतो. अशा परिस्थितीत रोहित न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोहम्मद शमीचा समावेश करू शकतो.

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 9 सामने झाले आहेत. यातील एक सामना, जो 2019 च्या विश्वचषकाचा साखळी सामना होता, तो रद्द करण्यात आला. त्याशिवाय न्यूझीलंडने 8 पैकी पाच वेळा विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला केवळ तीन वेळा विजय मिळवता आला आहे. भारताने 1987 मध्ये दोनदा आणि 2003 मध्ये एकदा न्यूझीलंडचा पराभव केला होता. याशिवाय 1975, 1979, 1992, 1999 आणि 2019 मध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला आहे. म्हणजे रेकॉर्ड ब्लॅककॅप्सच्या बाजूने आहेत.

भारताचा संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.