Rohit Sharma vs Virat Kohli: गेल्या 13 वर्षात कोण कोणावर भारी?

WhatsApp Group

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. या दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत, पण चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते की रोहित आणि कोहलीमध्ये कोण श्रेष्ठ? 2010 पासून गेल्या 13 वर्षांत सर्वात जास्त धावा कोणी केल्या आहेत आणि कोणी सर्वाधिक शतके ठोकली आहेत हे आकडेवारीच्या मदतीने जाणून घेऊया.

विराट कोहली

विराट कोहली गेल्या दशकात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर असलेला सर्वात यशस्वी फलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याची बॅट जबरदस्त बोलली आहे. एकदा तो क्रीजवर सेट की त्याला बाद करणे कठीण होऊन बसते. 2010 पासून, कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये 459 सामने खेळले आहेत आणि 23904 धावा केल्या आहेत, 72 शतके ठोकली आहेत आणि त्याची फलंदाजीची सरासरी 53.95 आहे.

2010 नंतर विराट कोहलीच्या धावा
विराट कोहलीने एकूण 459 सामने खेळले – 23904 धावा

  • 106 कसोटी सामने – 8195 धावा
  • 240 वनडे – 11727 धावा
  • 113 टी-20 – 3982 धावा

रोहित शर्मा

रोहित शर्मा डावाच्या सुरुवातीला स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडे तीन दुहेरी आहेत. त्याचबरोबर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये चार शतकेही झळकावली आहेत. 2010 पासून, रोहितने तिन्ही फॉरमॅटमध्ये 367 सामने खेळले आहेत आणि 15485 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 41 शतके झळकावली आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी 44.49 आहे.

2010 नंतर रोहित शर्माच्या धावा
रोहित शर्माने एकूण 367 सामने खेळले – 15485 धावा

  • 47 कसोटी सामना – 3320 धावा
  • 191 वनडे – 8647 धावा
  • 129 टी-20 सामने – 3518 धावा