रोहित शर्मा बनला भारताचा नवा ‘वनडे’ कर्णधार

WhatsApp Group

नवी दिल्ली – रोहित शर्मा हा भारताचा नवा ‘वनडे’ कर्णधार बनला आहे. अशी मोठी घोषणा BCCI ने केली आहे. आता रोहित हा भारताच्या टी२० आणि वनडे संघाचा कर्णधार असेल तर विराट कोहली हा आता फक्त कसोटी संघाचा कर्णधार असणार आहे.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापुर्वी बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणाही केली आहे. यातही रोहित शर्माला बढती मिळाली आहे. अजिंक्य रहाणेला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी हटवून रोहित शर्माला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधारपदी निवड झाली आहे.

द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ –  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद. शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, सिराज.

राखीव खेळाडू – नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अरजान नागवासवाला.

गेल्या अनेक दिवसांपासून भारताच्या वनडे संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता ही शक्यता खरी ठरली आहे. आपल्याला आता असंच म्हणावं लागेल की जसा जसा काळ पुढे जात आहे तसतसा भारतीय क्रिकेटमधील विराट कोहलीचं प्रस्थ कमी होत जात आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित भाराताच्या टी२० संघाचा कर्णधार बनला होता. आणि आता तो  वनडे संघाचाही कर्णधार बनला आहे. विराट गेले अनेक दिवस चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय, कसोटीमध्येही तो सपशेल अपयशी ठरला आहे. तो जर असाच अपयशी ठरत राहिला तर, त्याच्याकडे असलेलं कसोटी संघाचं कर्णधापदरही धोक्यात येऊ शकतं, हे सांगायला काही मोठ्या क्रीडा विश्लेषकाची गरज नाही.

दुसरीकडे भारताचा सर्वात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचं उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. कोहलीप्रमाणे अजिंक्यची बॅटही गेले अनेक दिवस शांत आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौरा हा अजिंक्य साठी ‘करो या मरो’ असा असणार आहे. कारण या कसोटी मालिकेत जर अजिंक्य नाही खेळला तर त्याचे भारतीय संघातील स्थानच धोक्यात येऊ शकते. अनेक युवा फलंदाज त्याच्या जागेवर आपली दावेदार दाखल करत असल्याने अजिंक्यला कोणत्याही परिस्थित आफ्रिकेविरुद्ध धावा कराव्याच लागणार आहेत. अशीच काहीशी स्थिती भारताचा दुसरा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराचाही आहे.