Rohit Sharma T20 WC: रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळू शकणार नाही? दुखापतीबाबत आलं मोठं अपडेट

WhatsApp Group

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे, जिथे 10 नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध सामना होणार आहे. अॅडलेडमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ सरावात व्यस्त आहे. दरम्यान, मंगळवारी टीम इंडिया सराव करत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्मा सराव करत असताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत चाहत्यांची चिंता वाढली होती, मात्र आता रोहित शर्माच्या दुखापतीचे ताजे अपडेट समोर आले आहे.

टीम इंडिया अॅडलेडमध्ये फलंदाजीचा सराव करत होती, त्यावेळी रोहित शर्मा फलंदाजीसाठी आला होता. येथे थ्रो डाऊन बॉल खेळताना रोहित शर्माच्या हाताला मार लागला, मात्र थोड्या विश्रांतीनंतर त्याने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली. राहुल द्रविडही नेटमध्ये उपस्थित होता. काही वेळातच फिजिओ आणि डॉक्टर रोहित शर्माकडे पोहोचले, जिथे त्यांनी रोहितच्या दुखापतीची तपासणी केली. फिजिओने हाताचा थोडासा मसाज केला आणि रोहित शर्मा काही वेळ ड्रिंक्स बॉक्सवर बसला. यादरम्यान त्याचे राहुल द्रविडशी बोलणे झाले आणि त्यानंतर तो पुन्हा नेटमध्ये आला.

T20 विश्वचषक 2022 मध्ये कर्णधार रोहित शर्माच्या मागील पाच सामन्यांमध्ये कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने 4,53,15,2,15 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा फलंदाजीच्या आघाडीवर फारसा यशस्वी ठरला नाही, परंतु त्याचे कर्णधारपद आतापर्यंत चांगले राहिले आहे आणि त्याला संघातील इतर खेळाडूंची चांगली साथ मिळाली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सुपर 12 टप्प्यात खेळल्या गेलेल्या 5 पैकी 4 गट सामने जिंकले. हे चार सामने जिंकल्यानंतर त्यांना 8 गुण मिळाले होते आणि भारतीय संघाने गट 2 मध्ये अव्वल स्थानी राहून उपांत्य फेरी गाठली होती. T20 विश्वचषक 2022 मध्ये सुपर 4 मध्ये पोहोचलेले संघ भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ आहेत. यातील पहिला सेमीफायनल सामना 9 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये तर दुसरा सेमीफायनल सामना 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. यानंतर 13 नोव्हेंबरला विजेतेपदाची लढत होणार आहे.