Rohit Sharma Marathi: ‘बरं झालं हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी..’,जेव्हा रोहित शर्मा मराठीत बोलतो, पाहा VIDEO

WhatsApp Group

Rohit Sharma : टीम इंडियाचा विधानभवनात सत्कार पार पडला. विधानभवनात भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. टी-20 विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला आहे. विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सत्कार सोहळा पार पडला.

रोहित शर्मा जेव्हा मराठीत बोलतो…

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)

रोहित शर्मा याने यावेळी मुंबईकर शैलीत सर्वांना अभिवादन करत म्हटलं की, ‘सर्वांना माझा नमस्कार. येथे बोलावल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं. 2023 मध्ये संधी हुकली. सूर्या, दुबे किंवा माझ्यामुळे हे झालं नाही, तर हे सर्वांमुळे सिद्ध झालं आहे. सर्व सहकारी माझ्यासोबत होते. प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता.  सूर्याच्या हातात कॅच बसला नसता.. बरं झालं हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी पुढे बसवले असते. सर्वांचे खूप खूप आभार.’

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)