कोलकाता: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा virat kohli फॉर्म गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने अर्धशतकं झळकावली असली, तरी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या घरच्या मालिकेत केवळ 26 धावा करू शकला आहे. तर शेवटच्या वनडे सामन्यात तो खातेही उघडू शकला नव्हता.
जेव्हा कर्णधार रोहित शर्मा Rohit Sharma टी-20 मालिकेपूर्वी India vs West Indies पत्रकार परिषदेत आला तेव्हा त्याला विराटच्या फॉर्मबाबतच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. पण यादरम्यान रोहितने सगळ्यांना जे उत्तर दिलं ते थक्क करणारं होतं. त्याने दिलेल्या उत्तरावरून असं जाणवते की तो विराटच्या फॉर्मबाबतच्या प्रश्नांना कंटाळला होता, एवढेच नाही तर त्याने मीडियालाही या प्रकरणावर गप्प राहण्यास सांगितले आहे.
पहिल्या T20 सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान, माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल तो म्हणाला, “मला वाटते की हे सर्व तुमच्यापासून (मीडिया) सुरू होते. तुम्ही लोकं काही दिवस गप्प बसाल तर सगळं ठीक होईल. जर तुम्ही काही गोष्टी थांबल्या तर सर्वकाही निश्चित चांगले होईल.”
रोहित पुढे म्हणाला, “तो खूप चांगल्या स्थितीत आहे आणि एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय संघाचा भाग आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतका वेळ घालवला आहे की त्याला दबावाच्या परिस्थितीला कसे सामोरे जावे हे माहित आहे. म्हणूनच मला वाटते की सर्व काही तुमच्यापासून सुरू होते, तुम्ही शांत राहिल्यास सर्व काही ठीक होईल Rohit Sharma backs Virat Kohli.”
संघातील खेळाडूंना सतत दुखापत होत असल्याबद्दल रोहित शर्मा म्हणाला, “आमचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे आणि दुखापती होणे निश्चितच आहे. त्या भूमिका पार पाडणाऱ्या लोकांना आपण संधी देणे महत्त्वाचे आहे. ही मालिका आणि पुढच्या मालिकेत आम्ही आमच्या क्षमतेचा चांगला उपयोग करून घेणे आणि ज्यांना संधी मिळते ते आम्हाला काय देऊ शकतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.”