टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या स्पर्धेत आतापर्यंत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तीन डावात त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. टीम इंडियाला आता पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध 19 ऑक्टोबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित नेट सेशनमध्ये काहीतरी वेगळे करताना दिसला.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. रोहित शर्माचे नेटवर गोलंदाजी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहितने ऑफ-स्पिन गोलंदाजी केली, त्यावेळी आर अश्विन त्याच्या जवळ उभा होता आणि त्याला महत्त्वाच्या टिप्स देताना दिसला. रोहित शर्माने टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी सांगितले होते की तो बॉलिंग करताना दिसेल. त्याचवेळी बांगलादेशच्या फलंदाजीच्या क्रमवारीत 4 डावखुरे फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत रोहित बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करू शकतो.
Rohit Sharma bowling in the nets. pic.twitter.com/ZSZ85GtCUz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 17, 2023
महाराष्ट्रातील सर्वात मोठा ड्रग माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांकडून अटक
2016 मध्ये शेवटची गोलंदाजी केली होती
रोहित शर्माने 2016 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटची गोलंदाजी केली होती. त्यानंतर रोहितने एकच षटक टाकले होते आणि त्यात 11 धावा दिल्या होत्या. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी गोलंदाजी केली आहे. रोहित शर्माच्या नावावरही आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक आहे. मात्र, खांद्याच्या दुखापतीमुळे त्याने गोलंदाजी केलेली नाही. रोहित शर्माच्या नावावर कसोटीत 2, एकदिवसीय सामन्यात 8 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1 बळी आहे.
Priyanka Chopraच्या गाण्यावर Anjali Aroraचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल
टॉप-5 फलंदाजांमध्ये रोहितचे नाव आहे
रोहित शर्मासाठी या स्पर्धेची सुरुवात खूपच खराब झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो खातेही न उघडता बाद झाला. पण पुढच्या दोन सामन्यांमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध 131 आणि पाकिस्तानविरुद्ध 86 धावा केल्या. यासह, त्याने 3 सामन्यात 217 धावा केल्या आहेत आणि विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.