विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधार रोहित करणार पुनरागमन

WhatsApp Group

मुंबई – वेस्ट इंडिजसोबत होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माचे दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे. तर विराट कोहली दोन्ही मालिकांसाठी उपलब्ध असणार आहे. भुवनेश्वर कुमारला वनडे संघातून वगळण्यात आले आहे, तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.

कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन

कर्णधार रोहित शर्मा दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका खेळू शकला नाही. कर्णधार झाल्यानंतर रोहितची ही पहिली वनडे मालिका असेल. गेल्या काही दिवसांपासून तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत होता आणि तिथेच तो बरा होत होता. बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार, दुखापतीतून किंवा कोणत्याही समस्येतून पुनरागमन करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला फिटनेस चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

टी-20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.

एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.