Rohit Sharma Net Worth: एका पोस्टसाठी रोहित शर्मा घेतो प्रचंड पैसा, एकूण संपत्ती जाणून तुम्हाला धक्का बसेल
Rohit Sharma Net Worth: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हिटमॅन म्हणून ओळखला जातो. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने सर्व काही साध्य केले आहे. कमाईच्या बाबतीत रोहित कोणाच्याही मागे नाही. ज्याप्रमाणे तो आपल्या बॅटने धावा काढतो, त्याच प्रकारे तो भरपूर पैसाही कमावतो. तर आज रोहितच्या वाढदिवशी, तो किती कमावतो आणि त्याची एकूण संपत्ती किती आहे हे देखील जाणून घेऊया?
𝐈𝐓’𝐒 𝐇𝐈𝐓𝐌𝐀𝐍 𝐃𝐀𝐘 💙
Happy birthday to the one and only Mr. 4️⃣5️⃣, Rohit Sharma. 🎂🥳#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @ImRo45 pic.twitter.com/dZ693GSikh
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2024
बीसीसीआय कडून दरवर्षी 7 कोटी रुपये मिळतात
रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि त्याला बीसीसीआयने A+ श्रेणीत ठेवले आहे. यासाठी बोर्ड रोहितला वर्षाला सात कोटी रुपये पगार म्हणून देते. याशिवाय 15 लाख रुपये मॅच फी बोर्डाकडून मिळते. एकदिवसीय सामना खेळण्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामना खेळण्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.
View this post on Instagram
आयपीएलमधून 16 कोटी मिळतात
रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी फ्रँचायझी त्याला 16 कोटी रुपये मानधन देते. हिटमॅनने मुंबईसाठी 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 178 कोटी रुपये कमावले आहेत.
एका पोस्टमधून 75 लाख कमवतो
रोहित शर्माची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 37.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. अशा परिस्थितीत तो इन्स्टा वरूनही भरपूर कमाई करतो. मिळालेल्या माहितीनुसार, तो एका प्रमोशनल इन्स्टा पोस्टसाठी 75 लाख रुपये घेतो.
View this post on Instagram
जाहिरातींमधून मोठी कमाई
रोहित शर्माही जाहिरातींमधून भरपूर कमाई करतो. सध्या तो जवळपास 28 ब्रँडशी संबंधित आहे. यामध्ये Jio Cinema, Max Life Insurance, Goibibo, CEAT Tyre, Hublot, Usha, Oppo, Highlander सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर रोहित प्रत्येक जाहिरातीसाठी सरासरी 5 कोटी रुपये आकारतो.
रोहित शर्मा मुंबईत एका आलिशान घरात राहतो, ज्याची किंमत सुमारे 30 कोटी रुपये आहे. हा फ्लॅट इतका महाग असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अरबी समुद्राचे 270 डिग्रीचे दृश्य. याशिवाय रोहितने हैदराबादमध्ये 5 कोटी रुपयांची हवेलीही खरेदी केली आहे. रोहित शर्माची एकूण संपत्ती 214 कोटी रुपये आहे.
View this post on Instagram