Rohit Sharma इतिहास रचणार? आफ्रिदीचा हा मोठा विक्रम मोडण्यासाठी फक्त 4 षटकारांची गरज 

WhatsApp Group

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना सोमवारी सेंट किट्स येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे. मात्र, यासाठी रोहित शर्माला सामन्यात 57 धावा कराव्या लागणार आहेत तर त्यासोबत त्याला चार षटकारही मारावे लागतील.

रोहित शर्मा हा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 473 षटकार मारले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला आणखी चार षटकार मारता आले तर तो शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडेल. शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 476 षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम जरी ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 553 षटकार मारले आहेत.

रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये ते स्थान गाठण्याची संधी आहे जिथे इतर कोणताही क्रिकेटपटू पोहोचू शकलेला नाही. रोहित शर्माने दुसऱ्या टी-20 सामन्यात 57 धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू बनेल.

टीम इंडियाला दुसरा टी-20 जिंकून मालिकेत आपली आघाडी मजबूत करण्याची संधी आहे. टीम इंडिया सध्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 44 चेंडूत 64 धावांची शानदार खेळी केली.