Rohit Sharmaला करोनाची लागण; चाहत्यांकडून भावनिक पोस्ट, म्हणाले…

WhatsApp Group

‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाली आहे. बीसीसीआयकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी रोहित शर्माची रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. सध्या त्याला हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याची काळजी घेत आहे.

आता आवडत्या खेळाडूला अशाप्रकारे कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 1 जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार्‍या एकमेव कसोटी सामन्यामध्ये खेळण्यासाठी लोक त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एक नजर टाकूया ट्वीट्सवर…