हिटमॅन रोहित शर्माने गुजरातविरुद्धच्या सामन्यात केली ‘ही’ अनोखी कामगिरी

WhatsApp Group

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५१ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये लढत होत आहे. सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज सुरुवात केली. ७४ धावा होईपर्यंत गुजरात टायटन्सला मुंबईचा एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. सलामीला आलेल्या कर्णधार रोहित शर्माने तर अवघ्या २८ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

कर्णधार रोहित शर्माने Rohit Sharma  सामन्यात सलामीला येत सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावत २८ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. त्याच्या या धावसंख्येचा मुंबईला चांगलाच फायदा झाला. त्याने या सामन्यामध्ये एकूण दोन षटकार लगावलेत.

गुजरातविरुद्ध हे २ षटकार लगावताच त्याने मुंबई संघाकडून खेळताना २०० षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे Rohit Sharma 200 sixes for MI. मुंबईकडून खेळताना २०० षटकार ठोकणारा रोहित दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी पोलार्डने हा कारनामा केला आहे. पोलार्डने मुंबईकडून खेळताना आजवर २५७ षटकार ठोकले आहेत. तर आता रोहितच्या नावावर २०१ षटकार आहेत.