IND vs AFG: रोहित शर्मा संतापला, भर मैदानात शुबमन गिलला दिल्या शिव्या? पहा व्हिडिओ

0
WhatsApp Group

India vs Afghanistan, Rohit Sharma Runout: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी-20 सामन्यादरम्यान रोहित शर्मा खूप संतापलेला दिसत होता. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अफगाणिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य दिले आहे. यावेळी रोहित शर्मा 14 महिन्यांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता आणि तो 0 धावांवर बाद झाला. या सामन्यात रोहित शर्मा धावबाद झाला. यावेळी तो त्याचा सहकारी शुभमन गिलवर चांगलाच संतापलेला दिसला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्मा धावबाद झाला.

अफगाणिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाची या सामन्यात सुरुवात खूपच खराब झाली. रोहित शर्मा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. खरंतर, रोहित शर्माने डावाच्या दुसऱ्या चेंडूवर सरळ शॉट खेळला आणि तो रन घेण्यासाठी धावला, मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या शुबमन गिल याने बॉल फिल्डरच्या आसपास जात नाहीये ना, हे पाहत राहिला. मात्र तोवर रोहित नॉन स्ट्राईक एंडवर येऊन पोहचला. दोघेही एकाच बाजूला पोहचले. रोहितने शॉट खेळल्यानंतर शुभमन गिलने रोहितला धावा न घेण्याचे संकेत दिले, पण रोहितला ते दिसले नाही. इब्राहिम झद्रान याने विकेटकीपर रहमानुल्लाह गुरुबाजच्या दिशेने अर्थात स्ट्राईक एंडवर बॉल फेकला. मात्र शुबमनने क्रीज न सोडल्याने स्ट्राईक एंडवर गुरुबाजने रोहितला रनआऊट केला.

शुभमन गिलच्या निष्काळजीपणामुळे तो धावबाद झाल्याचं रोहित शर्माला वाटत होतं. मग काय लाइव्ह मॅचदरम्यान रोहितला आपला राग आवरता आला नाही आणि त्याने शुभमन गिलला रागात काहीतरी सांगितल केली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यादरम्यान शुभमन गिल देखील रोहित शर्माला काहीतरी बोलताना दिसला, पण रोहितने त्याचे ऐकले नाही आणि रागाच्या भरात मैदानाबाहेर गेला. रोहित शर्माही ड्रेसिंग रूममध्ये रागाने बसला होता. रोहित धावबाद झाल्यानंतर शुभमन गिलही 12 चेंडूत 23  धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला मुजीबने यष्टिचित केले.

पहा व्हिडिओ –