
Rohit Sharma and Dinesh Karthik: मोहाली येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 दरम्यान (IND vs AUS) मैदानात एक अशी घटना घडली आहे ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 12व्या षटकात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची मान पकडताना दिसला. क्रिकेटच्या मैदानावर याआधी क्वचितच दिसली होती अशी ही गोष्ट होती. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याचा सहकारी खेळाडू दिनेश कार्तिकवर खूप ओरडत असल्याचे दिसत आहे. ओरड त्याने दिनेश कार्तिकचा गळाही पकडला. मात्र, यादरम्यान दिनेश कार्तिक हसताना दिसत आहे. या घटनेवर बाकीचे खेळाडूही हसताना दिसत आहेत.
Rohit Sharma try to kill Dinesh Karthik@ImRo45 @BCCI pic.twitter.com/06d6QpaPeH
— Jiaur Rahman (@JiaurRa91235985) September 20, 2022
हा किस्सा त्यावेळचा आहे जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ सामन्यात मजबूत स्थितीत होता. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 52 चेंडूत 87 धावांची गरज होती आणि त्यांच्या 8 विकेट शिल्लक होत्या. उमेश यादव येथे गोलंदाजी करत होता. 12व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथने कट करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या अगदी जवळ जाऊन यष्टीरक्षक कार्तिकच्या हातात गेला. खेळाडूंनी अपील केली, पण कार्तिक चेंडू आणि बॅटमधील संपर्काबाबत तितकासा स्पष्ट नव्हता.
रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंना चेंडू आणि बॅटमधील संपर्काचा आवाज ऐकू आला होता. अशा स्थितीत रोहितने रिव्ह्यू घेतला आणि थेट दिनेश कार्तिककडे जाऊन संताप केला. तो रागावलेला दिसत होता कारण चेंडू बॅटला लागला होता हे सगळ्यांना स्पष्ट होते, मात्र कार्तिकला ते दिसले नव्हते. त्याच षटकात उमेशने ग्लेन मॅक्सवेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवून टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन केले. मात्र, डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजीमुळे टीम इंडियाने हा सामना 4 विकेटने गमावला.