WIDE न दिल्याने अंपायरवर चिडला रोहित शर्मा, रागाच्या भरात DRS ची मागणी, VIDEO झाला व्हायरल

WhatsApp Group

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमहर्षक 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील बुर्सापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने विजयासाठी 238 धावांचे लक्ष दिले.  मात्र, डावाच्या दुस-या षटकात असे काही घडले की, हिटमॅन खूप रागावलेला दिसला.

यावेळी कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही खेळाडूवर नव्हे तर पंचांवर चिडला. यानंतर तो चांगलाच संतापलेला दिसला. त्याचबरोबर आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

भारतीय संघाच्या डावातील दुसरे षटक दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज वेन पारनेलने टाकले. त्याच्या षटकातील चौथा चेंडू लेग साइडच्या खूप बाहेर होता. अंपायर त्याला वाईड बॉल देणार असल्याचं दिसत होतं. मात्र अंपायरने वाईड दिले नाही. हे पाहून कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला आणि त्याने अंपायरकडे वाइडची मागणी करण्यास सुरुवात केली.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा