आजच्या दिवशीच 2019 च्या विश्वचषकात 5 शतके ठोकत रोहित शर्माने रचला होता इतिहास

टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्माने 2019 च्या वनडे विश्वचषकामध्ये 5 शतके ठोकली होती Rohit Sharma five hundreds. वनडे विश्वचषकामध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. ज्याला आज म्हणजेच 06 जुलै रोजी ३ वर्ष पूर्ण झाली. या दिवशी रोहित शर्माने श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराचा विक्रमही मोडला. 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदावर खेळल्या गेलेल्या विश्वचषकात त्याने 4 शतके झळकावली होती.
हिटमॅनने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या ICC क्रिकेट विश्वचषक 2019 स्पर्धेत ही कामगिरी केली होती. जिथे लीड्सच्या हेडिंगले स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहितने या विश्वचषकातील पाचवे शतक झळकावून आपल्या बॅटची ताकद दाखवली. या सामन्यात त्याने 91 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. तो 103 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि रजिताच्या चेंडूवर मॅथ्यूजकरवी झेलबाद झाला. याआधी रोहितने या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका (122), पाकिस्तान (140), इंग्लंड (102) आणि बांगलादेश (104) विरुद्ध शतके झळकावली होती.
हिटमॅनच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर रोहितने टीम इंडियासाठी आतापर्यंत 45 कसोटींमध्ये 8 शतके आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने 3137 धावा केल्या आहेत. तर 230 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32 शतकांच्या मदतीने 9283 धावा केल्या आहेत. त्याने 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 4 शतके, आणि 26 अर्धशतकांच्या मदतीने 3313धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये रोहितची गणना केली जाते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. विश्वचषक 2019 मध्ये त्याने विक्रमी 5 शतकांच्या मदतीने 648 धावा केल्या होत्या.