दिल्लीकडून झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माला 12 लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण

WhatsApp Group

मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2022 चा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सकडून 4 गडी राखून हरला. या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रोंहित शर्माला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांच्या स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार रोहितवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स संघाला 27 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे, असे आयपीएल व्यवस्थापनाने म्हटले आहे. ओव्हर रेटशी संबंधित संघाची ही पहिली चूक आहे, त्यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

स्लो ओव्हर रेट म्हणजे काय?
ओव्हर रेट म्हणजे एका तासात गोलंदाजाने टाकलेल्या षटकांची सरासरी संख्या. आयसीसीच्या नियमांनुसार, वनडे आणि टी-20 सामन्यांमध्ये एका तासात 14.1 षटके टाकावी लागतात आणि कसोटीत 14.2 षटके टाकावी लागतात.

एकदिवसीय सामन्यांमध्ये, गोलंदाजीला 50 षटके टाकण्यासाठी एकूण 3.5 तास दिले जातात. त्याच वेळी, टी-20 सामन्यात, संघाला एक डाव एक तास 25 मिनिटांत संपवावा लागतो म्हणजेच 20 षटकांचा कोटा टाकावा लागतो.