Rohit Sharma century: हिटमॅन रोहित शर्माने रचला इतिहास, झळकावले 12 वे कसोटी शतक
Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यापूर्वीच इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे. आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालाच्या मैदानावर खेळवला जात आहे. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. रोहितचे कसोटी कारकिर्दीतील हे 12वे आणि या मालिकेतील दुसरे शतक आहे. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावाच्या जोरावर आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा पहिला डाव केवळ 218 धावांवर आटोपला.
सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रोहितने आपल्या डावाचे शतकात रूपांतर केले. दरम्यान, त्याने यशस्वी जैस्वालसोबत पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या 250 च्या पुढे नेली.
💯 for Rohit Sharma! 🙌
His 12th Test ton! 👏
Talk about leading from the front 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/jnMticF6fc #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/LNofJNw048
— BCCI (@BCCI) March 8, 2024
सध्याच्या मालिकेतील रोहितची कामगिरी: राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात रोहितने शतक झळकावले होते. याशिवाय रांची कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावले. या सामन्यापूर्वी, मालिकेत त्याचा स्कोअर 2, 55, 131, 19, 14, 13, 24 आणि 39 धावा होता. या मालिकेत त्याने 400 हून अधिक धावा केल्या आहेत.
रोहितची कसोटी कारकीर्द: रोहितने त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळले आहेत, 101 डावांमध्ये सुमारे 45 च्या सरासरीने 4,100 हून अधिक धावा केल्या आहेत. 212 धावा ही त्याची या फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. 2013 मध्ये त्याने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. रोहितने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत आतापर्यंत 9,000 हून अधिक धावा केल्या आहेत.
इंग्लंडविरुद्ध रोहितची कामगिरी]: रोहितला इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध फलंदाजी करायला आवडते. त्याने इंग्लिश संघाविरुद्ध आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले असून, सुमारे 48 च्या सरासरीने त्याने 1,100 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात 4 शतकांचा समावेश आहे. या संघाविरुद्ध त्याची सर्वोच्च धावसंख्या 161 धावांची आहे. विशेष म्हणजे इंग्लंड हा एकमेव देश आहे ज्याविरुद्ध रोहितने 1000 पेक्षा जास्त कसोटी धावा केल्या आहेत.