
Rohit Sharma Covid-19 Positive: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. शनिवारी (25 जून) झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये रोहित शर्मा पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विट करत याची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने ट्वीटमध्ये लिहिले की, ‘शनिवारी झालेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) मध्ये कर्णधार रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो सध्या टीम हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
UPDATE – #TeamIndia Captain Mr Rohit Sharma has tested positive for COVID-19 following a Rapid Antigen Test (RAT) conducted on Saturday. He is currently in isolation at the team hotel and is under the care of the BCCI Medical Team.
— BCCI (@BCCI) June 25, 2022
रोहित शर्माने लीसेस्टरशायरविरुद्धच्या 4 दिवसांच्या सराव सामन्यात सहभाग घेतला होता. या सामन्यात त्याने पहिल्या डावात फलंदाजी केली होती. मात्र दुसऱ्या डावात तो फलंदाजीला आला नाही. दुसऱ्या डावात रोहितने त्याच्या जागी तरुण खेळाडू के. एस. भरतला सलामीला जाण्याची संधी दिली. रोहित सध्या संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमधील एका खोलीत आयसोलेशनमध्ये आहे.