Rohit Sharma International Debut: रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण, चाहत्यांसाठी केली भावनिक पोस्ट

WhatsApp Group

Rohit Sharma International Debut: भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी आजचा दिवश खूप खास आहे. आजच्या दिवशी 15 वर्षापूर्वी रोहित शर्माने भारताकडून आयर्लंडविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यासंदर्भात नुकतंच रोहित शर्मानं ट्वीट केले आहे. स्टार फलंदाज रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत आयर्लंडचा एकतर्फी पराभव केला होता. मात्र या सामन्यात रोहितला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत रोहितने लिहिले की, आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली आहेत. माझ्यासाठी हा छान प्रवास होता जो आयुष्यभर लक्षात राहील. माझ्या प्रवासाचा भाग असलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.  मी भारतासाठी खेळावं म्हणून ज्यांनी मला मदत केली त्यांचं विशेष आभार मानतो. सर्व क्रिकेट प्रेमी, चाहते आणि समीक्षकांचे आभार, संघासाठी तुमचे प्रेम आणि समर्थन हेच ​​आम्हाला सर्व अडचणींवर मात करण्यास मदत करते.

भारत आणि इंग्लंड यांच्यात रिशेड्युल केलेला कसोटी सामना येत्या 1-5 जुलैदरम्यान खेळायचा आहे. हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.