WTC Final: रोहित शर्माची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. जेव्हा तो आपल्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला फाटा देऊ शकतो. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात 43 धावांची खेळी केली. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
रोहितने सचिनचा हा विक्रम मोडला
रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 15 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 7 चौकार आणि 1 लांब षटकार मारून 43 धावा केल्या. यासह त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 70 षटकार ठोकले आहेत. तर सचिन तेंडुलकरच्या नावावर फक्त 69 षटकार आहेत. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने 91 षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय कसोटीत भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू:
- वीरेंद्र सेहवाग – 91 षटकार
- महेंद्रसिंग धोनी – 78 षटकार
- रोहित शर्मा – 70 षटकार
- सचिन तेडुलकर – 69 षटकार
- कपिल देव – 61 षटकार
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनिंग करताना 13000 धावा पूर्ण केल्या आहेत. आता 13,000 धावांचा मोठा आकडा गाठणारा रोहित शर्मा केवळ तिसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. वीरेंद्र सेहवागच्या नावावर ओपनिंग करताना 15758 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. तर सचिन तेंडुलकरने ओपनिंग करताना 15353 धावा केल्या आहेत. ओपनिंग करताना रोहितने एकदिवसीय सामन्यात 7807 धावा, कसोटी सामन्यात 1852 धावा आणि टी-20 सामन्यात 3372 धावा केल्या आहेत.
ओपनिंग करताना सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
- 15758 धावा – वीरेंद्र सेहवाग
- 15335 धावा – सचिन तेंडुलकर
- 13031 धावा – रोहित शर्मा
- 12258 धावा – सुनील गावस्कर
- 10867 धावा – शिखर धवन