Rohit Sharma Records: रोहित शर्माने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम

WhatsApp Group

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने विशेष कामगिरी केली. रोहित शर्माने या सामन्यात पहिला षटकार मारताच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम मोडला. रोहित शर्मा आता भारतातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. रोहित शर्माने सामन्याच्या तिसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत महेंद्रसिंग धोनीचा भारताच्या मैदानावर 123 एकदिवसीय षटकारांचा विक्रम मागे टाकला.

या सामन्यात रोहित शर्माने 38 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा हा जगातील दुसरा फलंदाज आहे. या यादीत ख्रिस गेल (553) पहिल्या क्रमांकावर आहे. वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शाहिद आफ्रिदी, ख्रिस गेल आणि सनथ जयसूर्या यांच्यानंतर रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे.

भारतातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

  • रोहित शर्मा – 125 षटकार
  • महेंद्रसिंग धोनी – 123 षटकार
  • सचिन तेंडुलकर – 71 षटकार
  • विराट कोहली – 66 षटकार