रोहितच्या टी20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण, विराटनंतर अशी कामगिरी करणारा रोहित दुसराच भारतीय

WhatsApp Group

IPLच्या 15 व्या मोसमातील 23 वा सामना मुंबई इंडियन्स Mumbai Indians आणि पंजाब किंग्ज Punjab Kings यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितने आयपीएलमध्ये 10 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

पंजाब किंग्जविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात रोहितने हा मोठा विक्रम केला आहे. या सामन्यात 10 हजार आकडा गाठण्यासाठी रोहितला 25 धावांची गरज होती. रोहित शर्मा या सामन्यात 28 धावांवर बाद झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 5 गडी गमावत 198 धावा केल्या. हा सामना मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. कारण याआधी खेळल्या गेलेल्या चारही सामन्यांत मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे. तर दुसरीकडे, पंजाबने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत.

रोहित शर्माने 362 डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने 299 डावात ही कामगिरी केली होती. म्हणजेच त्याने कोहलीपेक्षा 63 डाव जास्त घेतले. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या चेंडूवर षटकार ठोकत रोहितने १० हजार धावांचा टप्पा गाठला आहे. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. चालू मोसमातील 5 सामन्यांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.