IND vs ENG 1st T20: रोहित शर्माने छोट्या डावातही केला मोठा विक्रम, विराट कोहलीला टाकले मागे

WhatsApp Group

IND vs ENG 1st T20: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला आहे. कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वात जलद 1000 धावा करणारा तो कर्णधार ठरला आहे. रोहित शर्मा कोरोनामधून बरा होऊन संघात परतला आहे. रोहित शर्माने पहिल्याच षटकात आक्रमक पध्दतीने खेळाला सुरुवात केली, सॅम करनच्या पहिल्याच षटकापासून तो शॉट खेळू लागला. दुसऱ्या षटकातही रोहितने झटपट फलंदाजी केली, मात्र तिसऱ्या षटकात तो 24 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.

रोहित शर्माने आपल्या या छोट्या इनिंगमध्येही एक मोठा विक्रम आपल्या नावावर करत माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने भारताच्या T20 संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. गेल्या वर्षी T20 विश्वचषकानंतर विराटने T20 चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता, BCCI ने गेल्या वर्षीच रोहितची T20 कर्णधार म्हणून निवड केली होती. जाणून घेऊयात कर्णधार म्हणून सर्वात आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये जलद 1000 धावा करणारे जगातील पहिले 5 कर्णधार

कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा करणारे जगातील पहिले 5 कर्णधार

  • बाबर आझम – 26 डाव
  • रोहित शर्मा – 29 डाव
  • विराट कोहली – 30 डाव
  • फाफ डू प्लेसिस – 31 डाव
  • आरोन फिंच – 32 डाव