जयपूर – न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारी जयपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ५ गडी राखून पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण सामन्यादरम्यान, भारतीय डगआउटमधून एक व्हिडिओ समोर आला जो बराच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा मोहम्मद सिराजच्या डोक्यावर हात मारताना दिसत आहे.
रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला. वेगवेगळ्या ट्विटर हँडल्स, यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीतकडे हा व्हिडिओ पाहून ट्विटरवर आरसीबीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी रोहित आणि विराटची तुलना करायला सुरुवात केली आहे.
खरंतर हा व्हिडीओ सामन्यादरम्यानचा आहे ज्यात डगआउटमध्ये मस्ती सुरू आहे. गंमत म्हणून सिराजच्या मागे बसलेल्या रोहित शर्माने त्याच्या डोक्यावर मारले होते. यानंतर केएल राहुल, रोहित आणि सिराजही हसताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही समोर बसलेला दिसत आहे.
#INDvsNZ #RohitSharma #siraj @BCCI
Rohit bhai ne miya bhai ko jda tmacha ???????? pic.twitter.com/Kg4qgQw5Wx— Ankit (@_ankitdhakad22) November 18, 2021
रोहितने गंमतीने हा प्रकार केला असला तरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीने शेअर केला जात आहे. काहीजण याला विनोद मानून हसत आहेत तर काहींनी मनावर घेतलं आहे. विशेषत: आरसीबी आणि विराट कोहलीचे चाहते या व्हिडिओनंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाची विराट कोहलीच्या कर्णधारपदाशी तुलना करू लागले आहेत.