भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 सामन्यात रोहितने केल्या आहेत सर्वाधिक धावा, टॉप 5 मध्ये 4 भारतीय फलंदाज

India vs South Africa: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत झालेल्या T20 सामन्यांचे रेकॉर्ड पाहिल्यास रोहितचा क्रमांक पहिल्या क्रमांकावर येतो. या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीत चार भारतीय आहेत. यामध्ये रोहित पहिल्या स्थानावर आहे. त्याने 362 धावा केल्या आहेत. तर सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर आहे. रैनाने 339 धावा केल्या आहेत. पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीत जेपी ड्युमिनी हा एकमेव आफ्रिकेचा खेळाडू आहे. 295 धावांसह तो तिसऱ्या स्थानावर आहेत. विराट कोहली 254 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. शिखर धवनने 233 धावा केल्या आहेत.
T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित पहिल्या स्थानावर आहे. रोहितने 139 सामन्यात 3694 धावा केल्या आहेत. तर कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने 107 सामन्यात 3660 धावा केल्या आहेत. रोहितने या फॉरमॅटमध्ये 4 शतके आणि 28 अर्धशतके केली आहेत. तर कोहलीने एक शतक आणि 33 अर्धशतके केली आहेत. मार्टिन गप्टिल 3497 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने दोन शतके आणि 20 अर्धशतके केली आहेत.
भारत-दक्षिण आफ्रिका T20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- रोहित शर्मा – 362
- सुरेश रैना – 339
- जेपी ड्युमिनी – 295
- विराट कोहली – 254
- शिखर धवन – 233