
Roger Federer Announce Retirement: पुरुष टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आज आपल्या ट्विटर हँडलवरून निवृत्तीची घोषणा केली आहे. 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा रॉजर फेडरर गेल्या काही वर्षांपासून दुखापतीशी झुंजत होता. यामुळे त्याच्यावर अनेकवेळा शस्त्रक्रिया करावी लागली आहे. दुखापतीमुळे आणि शस्त्रक्रियेमुळे रॉजर गेल्या काही वर्षांपासून कोर्टवर आपली जुनी क्षमता दाखवू शकला नव्हता. दरम्यान, रॉजरने निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील आठवड्यात होणारी लेव्हर कप ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असेल त्यानंतर तो कोणत्याही ग्रँड स्लॅम किंवा टूर स्पर्धेत भाग घेणार नाही.
To my tennis family and beyond,
With Love,
Roger pic.twitter.com/1UISwK1NIN— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
20 वेळा ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडररने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक विशेष नोट लिहून त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे, त्याच्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ टेनिस कारकिर्दीत त्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्याने पत्नी मिर्का हिचेही आभार मानले आहेत. फेडररने आपल्या नोटमध्ये लिहिले की, तुम्हा सर्वांना माहित आहे की, गेल्या तीन वर्षांत मी माझ्या आयुष्यात दुखापती आणि शस्त्रक्रियांमुळे अनेक आव्हानांचा सामना केला आहे. मी पुन्हा कोर्टवर परतण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.
— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
मी 41 वर्षांचा आहे. 24 वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत मी 1500 हून अधिक सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. टेनिसने मला माझ्या स्वप्नांपेक्षा जास्त दिले आहे. पण आता माझ्यावर टेनिसमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. पुढील आठवड्यापासून लंडनमधील लेव्हर कप ही माझ्या कारकिर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असेल. मी भविष्यात टेनिस नक्कीच खेळेन पण ग्रँड स्लॅम किंवा टूर स्पर्धेत भाग घेणार नाही.
रॉजर फेडररने आपल्या आजवरच्या कारकीर्दीत 20 ग्रँड स्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. नदाव आणि ज्योकोविच पाठोपाठ सर्वाधिक विजेतेपदांच्या यादीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर होता. पण पुरुष एकेरीत सर्वाधिक विजेतेपदांच्या शर्यतीत फेडरर अनेक वर्ष आघाडीवर होता.
फेडररचा ग्रँड स्लॅम खजिना
आठ विम्बल्डन – (2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017)
सहा ऑस्ट्रेलियन ओपन- (2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018)
पाच अमेरिकन ओपन – (2004, 2005, 2006, 2007, 2008)
एक फ्रेंच ओपन – (2009)
– समीर आमुणेकर