
माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिन्नी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचा तो एकमेव उमेदवार होता. ते लवकरच पदभार स्वीकारतील, तर सौरव गांगुली आता पुन्हा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल म्हणजेच CAB चे अध्यक्ष होऊ शकतात.
1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची मंगळवारी मुंबईत झालेल्या BCCI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मंडळाचे 36 वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सौरव गांगुलीचा कार्यकाळ आता संपला आहे. गेली तीन वर्षे ते मंडळाच्या अध्यक्षपदावर विराजमान होते. हेही वाचा – ऑस्ट्रेलियाला मिळाला ‘नवा’ कर्णधार, डेव्हिड वॉर्नर नाही तर ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान
Former India cricketer Roger Binny appointed as the next BCCI President taking over from Sourav Ganguly.
(File Pic) pic.twitter.com/Tndldfc2el
— ANI (@ANI) October 18, 2022
या बैठकीत आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे. सौरव गांगुलीला आयसीसीच्या सर्वोच्च पदावर बढती मिळू शकते, असे मानले जात आहे. जर सौरव गांगुली यासाठी तयार नसेल तर भारतीय क्रिकेट बोर्ड पुन्हा ग्रेग बार्कले यांना पाठिंबा देऊ शकते. आयसीसीच्या सर्वोच्च पदासाठी नामांकनाची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. आयसीसी बोर्डाची पुढील बैठक 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान मेलबर्न येथे होणार आहे. हेही वाचा – T20 World Cup 2022: असे झाल्यास भारत विश्वचषक जिंकू शकतो, सुरेश रैनाची भविष्यवाणी