मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात सर्व काही ओके पण ररस्त्यांची अवस्था बेकार, खड्ड्यांमुळे एकाचा मृत्यू

WhatsApp Group

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ज्या ठिकाणहून येतात त्या ठाणे (Thane ) येथे सर्व काही ओके आहे पण रस्त्यांची अवस्था बेकार असं तेथील नागरिक म्हणून लागले आहेत. मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाण्यामध्ये रस्त्यांची इतकी दुर्दशा झाली आहे की, लोकांना विनाकारण आपले प्राण गमवावे लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे जीवघेणे ठरत आहे. ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही घटना घोडबंदर रोडवरील काजूपाडा या भागात घडली आहे. रस्त्यांवरुन दुचाकी चालवत असताना ती खड्ड्यात गेल्यामुळे तोल जाऊन हा दुचाकीस्वार खाली पडला आणि तोवर पाठीमागून आलेल्या बसच्या चाकाखाली गेला. यात त्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

या भागात ही घटना घडल्यानंतर अवघ्या काहीच मिनीटांतच पुन्हा त्याच ठिकाणी अशीच घटना घडली. पण दैव बलवत्तर म्हणून दुसरा दुचाकीस्वार वाचला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्या रस्ते नॉट ओके असं नागरिक म्हणू लागले आहेत.

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपात ठाण्याला मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता इथे लक्ष घालून शहराच्या विकासावर अधिक भर द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ठाण्याच्या विकासाची मुहूर्तमेढ ही खड्डेमुक्त रस्त्यांनी करावी अशीही मागणी ठाणेकर करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागरिकांच्या मागणीकडे कसे पाहतात याबाबत उत्सुकता आहे.