केरळमधील मलप्पुरममध्ये एक रस्ता अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कर्नाटकातून शबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस आणि ऑटो यांच्यात भीषण टक्कर झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ऑटोचालकासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ऑटोचालकासह दोन महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्वजण ऑटोमध्ये प्रवास करत होते, असे सांगण्यात येत आहे.
याशिवाय काही लोक जखमी झाल्याचीही बातमी समोर आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, सर्वांवर उपचार सुरू आहेत. सध्या काही लोकांची प्रकृती सामान्य असल्याचे डॉक्टरांच्या पथकाने सांगितले.
अपघात कसा झाला?
ही घटना शुक्रवारी संध्याकाळची आहे. ही घटना सायंकाळी 6 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, एवढा मोठा अपघात कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या भीषण अपघाताबाबत मलप्पुरमचे जिल्हा प्रमुख शशिधरन एस म्हणाले की, पोलीस मोटार वाहन विभागाच्या सहकार्याने या अपघाताची चौकशी करतील.
”ज्याने शिकवलं त्याच्याच पाठीत वार केलास”, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते संतापले
#WATCH मलप्पुरम, केरल: कर्नाटक से सबरीमाला तीर्थयात्रियों को ले जा रही एक बस और ऑटो में टक्कर होने से ऑटो चालक सहित 5 लोगों की मृत्यु हो गई। घायलों को अस्पताल ले जाया जा रहा है। (15.12) pic.twitter.com/TxN8Ey80CK
— ANI_HindiNews (@AHindinews) December 15, 2023