लोकप्रिय कन्नड रेडिओ जॉकी, रचना यांचे मंगळवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ती ३९ वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार, रचनाने जेपी नगर येथील तिच्या फ्लॅटमध्ये छातीत दुखत असल्याची तक्रार केली आणि तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र उपचारादारम्यान तिला मृत घोषित करण्यात आले.
आरजे रचना यांचे इतक्या लहान वयात निधन झाल्याने कर्नाटकातील अनेक राजकारणी, सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. भाजपचे बेंगळुरू मध्यवर्ती खासदार पीसी मोहन यांनी आरजे रचना यांच्या निधनावर ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
Shocked and saddened to hear about the sudden demise of popular RJ #Rachana from Bengaluru.#RJRachana became a household name among Bengalureans in the last decade with her unique sense of humor.
May God give strength to her family, fans, and loved ones.
Om Shanti. pic.twitter.com/Dudxf3RoFT
— P C Mohan (@PCMohanMP) February 22, 2022