सध्या मी टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यास पात्र नाही, आयपीएल स्टारचं मोठं वक्तव्य

WhatsApp Group

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind Vs Sa) T20 मालिका खेळत आहे आणि 1-2 ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू सुट्टी साजरी करत असल्याने या मालिकेत भारत युवा खेळाडूंवर अवलंबून आहे. दरम्यान, आयपीएलमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला युवा खेळाडू रियान पराग याने सध्या भारतीय संघात निवड होण्याच्या लायकीचे नसल्याचे म्हटले आहे.

इंडियन प्रीमियर लीग-2022 (IPL 2022) मध्ये रियान पराग यापेक्षा चांगला खेळ दाखवू शकला नाही, फक्त एक-दोन सामन्यांमध्ये रियान परागने आपली ताकद दाखवून दिली. रियान पराग म्हणाला की त्याच्या संघासाठी सामने जिंकणे खूप महत्वाचे आहे, मी काही सामन्यांमध्ये हे केले पण ते पुरेसे नाही.

आयपीएल 2022 मधील कामगिरीबद्दल रियान पराग म्हणाला की, मी माझ्या फलंदाजीच्या स्थितीवर खूश आहे, परंतु माझ्या कामगिरीवर मी खुश नाहीय. मला 6-7 व्या क्रमांकावर अधिक चांगली कामगिरी करायची आहे, जर तुम्ही पाहिले तर एमएस धोनीने स्वतःची ओळख एक फिनिशर म्हणून कायम ठेवली. मी त्याच्याकडून खूप काही शिकतो आणि ते माझ्या खेळात लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. 20 वर्षीय रियान पराग आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. या मोसमात रियान परागने 17 सामन्यांच्या 14 डावात केवळ 183 धावा केल्या होत्या.