मुंबई – अभिनेत्री राखी सावंतचा पती रितेश सिंगने राखीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तिला धमकी देणारी पोस्ट लिहिली आहे. फोटोमध्ये राखी लाल कपड्यांमध्ये नववधूसारखी वेशभूषेत दिसत आहे. राखी सावंत आणि रितेश सिंग आता एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. रितेशने पोस्टसोबत एक लिंक देखील शेअर केली आहे आणि राखीला रिअॅलिटी शोमध्ये माझ्यासमोर येऊ नको असं म्हटलं आहे.
रितेशने आपल्या इंस्टाग्रामवर राखीचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘राखी जी तुम्हाला एक साधी सूचना आहे. कृपया कोणत्याही गेम शोमध्ये तु माझ्यासमोर येऊ नको. नाहीतर मी तुझा बँड वाजवीन, नंतर तु पुन्हा कोणत्याही शोला जाऊ शकणार नाही. ‘बिग बॉस 15′ च्या वाईल्ड कार्ड एन्ट्री स्पर्धकाचे मी काय हाल केले होते हे लक्षात असेल तुझ्या. तेव्हा चिल कर’,” असं रितेशने लिहिलं आहे.
View this post on Instagram
रितेशच्या पोस्टवर राखीने कमेंट करताना लिहीले की. तू ही नाटकं बंद करा’ , त्यावर रितेश पुन्हा म्हणाला, ‘तू ड्रामा क्वीन आहेस.’ यानंतर राखीने रितेशला कमेंट सेक्शनमध्ये त्याचे फोटो वापरू नका, असा इशाराही दिला होता. ‘यावर उत्तर देताना रितेशने लिहिले की, ‘मॅडम तुम्ही माझे नाव वापरणे बंद करा आणि मग मीही तुमचे फोटो वापरणे बंद करेन.