
साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा ‘कंतारा’ हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. रिलीज होऊन सुमारे 40 दिवस उलटूनही ‘कंतारा’ चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना सतत आकर्षित करत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आता ऋषभ शेट्टीच्या ‘कंटारा’ने जगभरात 400 कोटींचा व्यवसाय करून इतिहास रचला आहे.
400 कोटींच्या क्लबमध्ये ‘कंतारा’चा समावेश
30 सप्टेंबर रोजी कन्नड भाषेत ‘कंतारा’ रिलीज झाला. चित्रपटाने सुरुवातीपासूनच दाक्षिणात्य भाषेत अप्रतिम कामगिरी केली. हे लक्षात घेऊन 14 ऑक्टोबरला ‘कंतारा’ हिंदीतही सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि हिंदी पट्ट्यातही ‘कंतारा’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कलेक्शन करून सर्वांनाच चकित केले. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी मंगळवारी सोशल मीडियावर ‘कंतारा’च्या जगभरातील कलेक्शनची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.
View this post on Instagram
‘कंतारा’ने या शहरांमध्ये इतकी कमाई केली
कर्नाटक – 168.50 कोटी
आंध्र प्रदेश-तेलंगण – 60 कोटी
तामिळनाडू – 12.70 कोटी
केरळ – 19.20 कोटी
उत्तर भारत – 96 कोटी
भारतात चमकदार कामगिरी करणाऱ्या ‘कंतारा’ला परदेशातही भरभरून दाद मिळाली. ऋषभ शेट्टीच्या ‘कंतारा’ने परदेशात 44.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ऋषभ शेट्टीने ‘कंतारा’मध्ये दमदार अभिनय केला आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या यशाचे श्रेय ऋषभला जावे तितके कमी आहे. याशिवाय ‘कंतारा’च्या हिंदी व्हर्जनच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या क्षेत्रात ‘कंतारा’ने 80 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अशा परिस्थितीत ‘कंतारा’ यावर्षी निवडक ब्लॉकबस्टर साऊथ चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.